तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापना करूण प्रारंभ.


मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सिंह गाभाऱ्यात घटस्थापना


रिपोर्टर: - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास रविवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी  करण्यात आले.

यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान मुकूंद संभाजी कदम यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

तत्पूर्वी गोमुख आणि कल्लोळ तीर्थातील पवित्र जल घटकलशात भरण्यात आले. त्यानंतर मंदीर संस्थान अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटकलश संबळाच्या तालावर, आई राजा उदो उदोच्या गजरात वाजत गाजत मंदीरात आणण्यात आला. त्यानंतर मंदीरातील सिंह गाभाऱ्यात ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचाराच्या उद्घोषात अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे यांनी सपत्नीक विधिवत घटस्थापना केली.

यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष बापूसाहेब कने, तहसीलदार योगिता कोल्हे, महंत तुकोजी महाराज, महंत चिलोजी महाराज, पाळीचे पुजारी मुकुंद कदम,  तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन साळुंके, तु. भ. भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे परमेश्वर,तु.भ.उपाध्ये मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो,व्यवसस्थापक सिद्धेश्वर इंतुले,शहर प्राधिकरण सदस्य विकास मलबा, दिलीप नाईकवाडी, युवराज साठे, धनंजय पाटील, गब्बर सोंजी, बापूसाहेब सोंजी, शशिकांत पाटील, सचिन पाटील,विशाल रोचकरी, अविनाश धट, प्रा. संभाजी भोसले, विपीन शिंदे, अविनाश गंगणे, किशोर गंगणे, श्रीकृष्ण साळुंके, सचिन परमेश्वर, प्रशांत सोनजी,श्रीराम अपसिंगेकर, रमेश लसने, मकरंद प्रयाग यांची उपस्थिती होती.

देवीच्या घटस्थापनेनंतर मंदीर परिसरातील उपदेवतांच्या घटकलशांची विधिवत प्रतिष्ठापना झाली. यानंतर नवरात्र काळातील यज्ञविधीसाठी ब्रह्मवृंदांना मंदीर संस्थान अध्यक्ष दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते वाण देण्यात आली.


सिंहगाभाऱ्यात देवीच्या चांदिच्या दरवाज्याच्या डाव्या बाजुला घटस्थापना करण्यात आली.नंतर खंडोबा मानकरी वाघेकुंटूबा आहेत मंदिरात घटस्थापना करून मातंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना करुन शारदीय नवराञास सुरूवात होते. देवीच्या घटस्थापनेनंतर तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेसाठी लाघनारे धान्य आण्णा शेटे हे देतात त्यांचा मान आहे .

या घटस्थापनेने तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. नवमीला होमकुंडावर दुपारी पारंपारिक धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर घटोत्थापन करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

घटस्थापनेपूर्वी शनीवारी पहाटे १ वा. चरणतीर्थ पूजा पार पडली. १.३० वा. पूजेची घाट झाल्यानंतर २ वा. तुळजाभवानी देवीचा निद्राकाल संपन्न झाला. त्यानंतर निद्रिस्त केलेली देवीची मूर्ती चांदीच्या पलंगावरून काढून पूर्ववत सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. यानंतर २.३० वा. देवीला अभिषेक करण्यात आला.

रविवारी सकाळी ६ वा. पूजेची घाट झाल्यानंतर नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवीस पंचामृत अभिषेक आणि सिंहासन पूजा संपन्न झाल्या.नित्य अभिषेक विधी संपन्न झाल्यानंतर देवीस वस्त्रअलंकार चढवण्यात आले. त्यांनतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या