आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी एक्सलेंट अवार्डने झाला सन्मान

                   
रिपोर्टर: ग्रामिण भागातील शिक्षण क्षेत्रामध्ये एक सकारात्मक चळवळ उभी करून , ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना केजी टू पीजी चे शिक्षण एका छत्राखाली मिळावे व शिक्षणातून त्यांचा चरितार्थ उभारावा या उद्देशाने सुधीर (अण्णा ) पाटील यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शाळा आणि अनेक  महाविद्यालयांची उभारणी केली.केंद्रबिंदू होता तो ग्रामीण विद्यार्थी त्यांच्या या कार्याची दखल थेट दिल्ली येथील ' चाणक्य फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आली व मा. सुधीर पाटील यांना"डॉ .श्यामाप्रसाद मुखर्जी एक्सलेंट अवार्डने " सन्मानित करण्यात आले . अतिशय दिमाखदार अशा सोहळ्यामध्ये भारताचे माजी मानव संसाधन विकास मंत्री तथा पद्मविभूषण मा'डॉ .मुरली मनोहर जोशी, तिबेट संसदेचे उपसभापती आचार्य येसूजी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुस्लिम मंचाचे प्रमुख इंद्रेश कुमार, भारत सरकारचे अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्रीमान रामेश्वरजी तेली, उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आनंदजी शुक्ला या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सुधीर (आण्णा ) पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अतिशय मोजक्या लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते . शहरी भागात संस्था उभा करून फक्त पैसे  न कमावता शिक्षणातून संस्कार व चरितार्थ घडावा व लहरी निसर्गावर मात करता यावी या उदात्त हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून कायापालट घडविला आहे . याची खऱ्या अर्थाने दिल्ली येथील चाणक्य फाऊंडेशनने दखल घेतली आणि अतिशय महत्त्वाचा असणारा हा पुरस्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (आण्णा ) पाटील यांना मोठ्या सन्मानाने देण्यात आला . डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल उस्मानाबादकरांच्या वतीने माननीय सुधीर (अण्णा )पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या