वंचित बहुजन आघाडीमधून गोपीचंद पडळकर बाहेर
रिपोर्टर: गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजनामा दिल्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असुन पडळकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आसल्याची चर्चा आहे.
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करणार आसल्याचे बोलले जात आहे.  ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.पडळकर यांनी राजनामा दिल्यावर माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढील दोन दिवसात आपली राजकीय भुमीका ठरवू असे सांगीतले.
आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची चर्चा सुरु होती. तसंच गोपीचंद पडळकर भाजपामध्ये प्रवेश करत घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
अद्याप भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही.युतीचा निर्णय झाल्यानंतर गोपीचंद पडळकरर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपा, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सांगलीत झाली होती. सांगलीत भाजपाने संजयकाका पाटील, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या