भूम, परंडा, वाशीमधून कॅप्टन संकेत चेडे विधानसभेच्या रिंगणातकॅप्टन चेडे यांना त्यांचे भाऊजी म्हणजेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलेंगकर यांच्या माध्यमातून राजकीय पाठबळ मिळत असले तरी भूम, परंडा, वाशीमध्ये शिवसेवेकडून लढण्यासाठी एकापेक्षा एक सरस असे उमेदवार आहेत. त्यामध्ये कॅप्टन चेडे यांनी मागील काही दिवसापूर्वी मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी घेवून संपर्क वाढविण्याच्या दिसत आहेत. कॅप्टन चेडे हे पूर्वीपासून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातून कोणत्यापक्षाकडून तिकीट घेवू लढणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॅप्टन चेडे यांनी अनेक शेतकरी आंदोलनामध्ये भाग घेवून शेतकर्‍यांच्या मदतीला येणारी कामे केले आहेत. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या मालाला भाव असेल किंवा मुंबईसारख्या ठिकाणी शेतकर्‍यांना थेट ग्राहकांशी भाजीपाला विकणे अशा प्रकारच्या शेतकर्‍यांच्या हिताची कामे चेडे यांनी केली आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यातील जनतेपर्यंत कॅप्टन पोहचलेले दिसतात. मतदारसंघातील शेतकरी, युवा तसेच विद्यार्थी यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चेडे हे भेटलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघात सर्वस्तरातील लोकांमध्ये त्यांची ओळख निर्माण झालेली आहे.
सामाजिक कामामध्ये चेडे पहिल्यापासूनच अग्रसेर आहेत. त्यासाठी त्यांना उस्मानाबाद येथे कार्यरत असलेल्या भूम, परंडा, वाशी मित्रमंडळाच्यावतीने विशेषरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कॅप्टन चेडे हे जेट एअरवेज या कंपनीमध्ये तेरा वर्षापासून कॅप्टन या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अगळ्यावेगळ्या व्यवसायामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघातील युवक वर्गात एक वेगळेच आकर्षण आहे. त्याचा फायदा चेडे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. कॅप्टन चेडे यांन मागील दोन वर्षामध्ये मतदारसंघातील काही महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिक्षणापासून वंचित राहणार्‍या  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविणे, त्याचबरोबर मतदारसंघात ठिकठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची रोपे देवून वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि लोकांच्या अडअडचणींना धावून जाणे अशा प्रकारची कामे चेडे यांनी हाती घेतली आहेत. या कामाच्या माध्यमातून चेडे यांचा थेट जनतेशी संपर्क निर्माण झाला आहे. याचा फायदा नक्कीच चेडे यांना निवडणुकीमध्ये होवू शकतो. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हाती सेनेचे सर्व सुत्रे असल्याचे पाहता कॅप्टन चेडे यांचा निभाव कसा लागणार हा देखील चेडे यांच्यासाठी मोठा प्रश्‍न आहे. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून चेडे यांना नाही मदत झाली तर ते अपक्ष देखील लढतील अशी माहिती कॅप्टन चेडे यांनी दिली.
मागील काही दिवसापूर्वी वाशी येथे प्रशांत चेडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला शिवसेना मेळावा यावेळी कॅप्टन चेडे यांची गैरहजरी होती. त्यामुळे कॅप्टन चेडे हे अपक्ष लढणार आहेत हे निश्‍चित आहे. चेडे यांनी अपक्ष लढण्याच्या तयारीने सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. परंतु शिवसेनेच्या गोठ्यातून चेडे यांना मदत होईल किंवा नाही हे सांगता येत नाही.

कॅप्टन चेडे यांचे राजकीय आणि सामाजिक पाठबळ
कॅप्टन चेडे हे हैद्राबाद मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनानी खंडेराव चेडे यांचे  नातू आहेत. तसेच वाशी शहरातील नगरपरिषदचे अध्यक्ष नितीन चेडे यांचे ते पुतणे आहेत. त्याचबरोबर कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आता सेनेमध्ये प्रवेश केले प्रशांत चेडे यांचे देखील ते पुतणेच लागतात. महत्वाचे म्हणजे फडणवीस सरकारमध्ये मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे कॅप्टन चेडे हे सख्खे मेहुणे आहेत.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकाधिकार शाहीला कंटाळलो-
उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेची सगळी सुत्रे शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे असल्याने सावंत यांनी एकाधिकार शाही चालविली आहे असे मत सावंत यांचे नाव न घेता कॅप्टन चेडे यांनी व्यक्त केले. या एकाधिकार शाहीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी निर्माण झाली असून, एकनिष्ठ शिवसैनिक अडगळीला पडत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्याचे चेडे यांनी सांगितले.

निवडणूक जरी दुसर्‍या पक्षातून लढलो तरी बाळासाहेबांच्या विचाराला माणणार कार्यकर्ता 

निवडणूक जरी दुसर्‍या पक्षातून लढलो तरी पहिल्यापासून सेनेशी मी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे सेनेचे विचार मी कधीही सोडणार नाही. त्यामुळे भूम, परंडा, वाशी या मतदासंघातील मुलभूत प्रश्‍नांसाठी मी पक्षाचे लेबल नाही मिळले तरी अपक्ष लढणार आहे अशी माहिती कॅप्टन चेडे यांनी दै. लोकशाशनशी बोलताना दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या