गोरमाळे येथे सिताफळ संशोधन कार्यशाळा संपन्न: शास्त्रज्ञ गोविंद मुंडे यांची उपस्थिती


मोठया संख्येने महीला,पुरूष योच्या सह शेतक—यांची उपस्थिती 


 रिपोर्टर:  गोरमाळे ता बार्शी येथील मे मधुबन फार्म अँड नर्सरी यांचे संयुक्त विद्यमाने सिताफळ लागवड व फळ बाग व्यवस्थापन  या राज्यस्तरीय मोफत एक दिवसीय  विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेला अबेजोगाई सीताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ गोविंद मुंडे यांची उपस्थिती होती.
गोरमाळे येथे आयोजित कार्यशाळेला रत्नागिरी,नांदेड ,सातारा ,हैदराबाद यासह मराठवाडा,विदर्भ आदी भागातून पुरुष व महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमसाठी  सिताफळ संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ कसपटे कृषी सहायक श्री गणेश पाटील महाग्रेप्स  चे  रवींद्र शिंदे प्रमुख पाहुणे  बालाजी विधाते आदी उपस्थित होते. .सिताफळ लागवड कशी करावी छाटणी कशी घ्यावी .लागवड केल्याचे नंतर त्याचे कुठल्या प्रकारे व्यवस्थापन करावे लागते. हंगाम लवकर सुरू होईल प्राथमिक स्थरावर होणाऱ्या चुका निदर्शनास आणून त्याचे निराकारण त्याचबरोबर गुणवत्ता पूर्ण रोपाची वाढ व त्याचे संगोपनात होणाऱ्या तांत्रिक चुका याची माहीती देण्यात आली. बाळांनगर व एन एम के 1 हे तुलनात्मकदृष्ट्या कसे फायदेशीर आहे प्रक्रिया उद्योगात  रबडी आइस्क्रीम विस्तृत क्षेत्रात यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. हे  कसपटे यांनी प्रशिक्षण देताना स्पष्ट केले. पाटील यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमत शिवार फेरी घेऊन  तांत्रिक स्वरूपाची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली.यासह इतर माहिती  शेतकरी वर्गाला दिली. मधुबनफार्म मधील 42 प्रकारच्या सिताफळ प्रजातीची ओळख उपस्थितांना करून दिली. किड नियंत्रण या विषयावर रवींद्र कसपटे यांनी तर जैविक कीड नियंत्रणवर रवींद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सर्व उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रवीण कसपटे यांनी मानले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या