रिपोर्टर: मराठवाडा जरी दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो.परंतु त्यांची दुसरी एक ओळख मराठवाड्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व स्थळांचा जर्णोध्दार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. संभाजीराजे यांनी केले. ते उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील ऐतिहासिक स्थळ असलेल्या गोसावी मठाला भेट देण्यासाठी आले होते.
यावेळी तुळजापुर विधानसभेसाठी इच्छुक असलेले योगेश केदार, माजी सरपंच नवनाथ क्षिरसागर, भाजपाचे तुळजापुर तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, पं.सचे माजी सभापती नानासाहेब कदम, उपसरपंच कल्याण जाधव, शिवाजी इतबारे, पांडुरंग पवार, बाळासाहेब क्षिरसागर, साहेबराव राऊत, पोलिस पाटील भैरवनाथ दरेकर, मारुती कदम, सामाजिक कार्यकर्ते गणेश क्षिरसागर, विजय क्षिरसागर, नवनाथ इतबारे, सचिन खंडाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बोलताना राजे पुढे म्हणाले की, स्थानिक राजकर्त्यांकडुन मराठवाड्यात असणार्या ऐतिहासिक वस्तुकडे दुर्लक्ष केले जातेय हे दुर्देवच म्हणावे लागेल. आंबेवाडी गावात असणारी गढी हा ऐतिहासिक वारसा आहे. अशा अनेक वास्तु मराठवाड्यात आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले तर येत्या काही वर्षात त्या नामशेष होतील. ही ऐतिहासिक वस्तु असणे ही आपल्या गावची जमेची बाजू आहे. मात्र कोणताही मोठा नेता ऐतिहासिक वस्तुला भेट देण्यासाठी आला नाही. परंतु, ज्यांना ज्यांना आपल्या भागाचा विकास करायचा आहे. ज्या तरुणाला समाजाला पुढे नेयचा आहे त्याच्यापाठीमागे छत्रपतींचे घराणे सदैव राहणार आहे. याबरोबरच मराठवाड्यात असणार्या दुष्काळावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

*युवा नेतृत्वाला साथ द्या*
माझ्यासोबत राहुन महाराष्ट्र आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत सदैव तत्पर राहणारा युवक म्हणून योगेश केदारकडे पाहतो. त्यांची उस्मानाबाद जिल्हाच्या विकासाबाबतची तळमळ पाहिली असुन तालुक्याच्या विकासात तो नक्कीच हातभार लावेल अशी आशा आहे. यामुळे आपण या युवा नेतृत्वाला साथ देण्याचा आवाहनही खा.संभाजीराजे यांनी यावेळी केले
0 टिप्पण्या