भाजपच्या स्टेजवर कार्यक्रमाआधी खुर्च्या पकडणारांची गर्दी वाढली.रिपोर्टर: भाजपमध्ये इनकमींग जोरात सुरू आसल्याने कार्यक्रमाच्या स्टेजवर कार्यकर्त्याची आणि पदाधिका—यांची गर्दी वाढली असुन कार्यक्रमाच्या अधी खुर्च्या धरूण बसण्याची वेळ काही जनांवर आली तर भाजपचे निष्ठावंत मात्र स्टेजवर उभे राहील्याचा प्रत्यय काल आलेल्या मुख्यमंञ्यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान आला.


संध्याला मराठवाडयात पाउस नसतानासुध्दा भाजपाचे पिक जोरात आल्याने कार्यकर्त्याची आणि पदाधिका—यांची संख्याही त्याच तुलनेत वाढत आहे.त्यामुळे भाजपच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर कार्यक्रमाआधी खुर्च्या पकडुन बसण्याची वेळ काही नामांकीत लोकावर येत आहे.काल उस्मानाबादमध्ये महाजनादेश यात्रेवेळी मुख्यमंत्री येण्याच्या दोन ते तिन तास आधी स्टेजवर खुर्च्या पकडण्याची वेळ काही जनांवर आली.त्यामुळे जिल्हयातील भाजपचे निष्ठावंत लोक कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर उभे राहीलेले दिसले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या