नेहा हुंबे हीचे यश:बागलकोट येथे BAMS ला मिळाला प्रवेश

 रिपोर्टर: भुम येथे आरोग्य विभागात चालक म्हणून काम करणारे नंदकुमार हुंबे यांची मुलगी व स्वातंञ्य सैनिक मुरलिधर किसनराव हुंबे यांची नात नेहा हुंबे हिला कर्नाटकातील बागालकोट येथे BAMS या मेडीकल पदवीसाठी प्रवेश मिळाला असुन या मिळालेल्या संधीमुळे तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

नेहा चे ​प्राथमिक शिक्षण रविद्र हायस्कुल भुम येथे झाले असुन आकरावीचे शिक्षण लातुर येथिल दयानंद हायस्कुल तर 12 वी विज्ञान विभागाचे शिक्षण ना.भी तांबे महाविदयालय जामखेड या ठिकाणी झाले आहे.नेहाचे वडील नंदकुमार मुरलीधर हुंबे हे भुम येथे आरोग्य विभागात चालक पदावर काम करत आहेत तर आई सौं वंदना नंदकुमार हुंबे या गृहीनी आहेत.नेहाला मिळालेल्या यशा बददल जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे,डॉ.विजयकुमार सुळ,डॉ.कांता सुळ वैधकिय अधिक्षक भूम तसेच दीप्ती हुंबे, सिद्धेश्वर शेलार, प्रमोद परजणे,अमोल गोरे त्याच बरोबर रविद्र हायस्कुल चे शिक्षक भोरे,लिमकर,तटाळे,एस व्ही.सुतार,अप्पा शिंदे यांच्या सर्वाच्या वतीने नेहाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या