लुडो जुगार खेळणा—या 11 मास्तरांवर कारवाई:नळदुर्ग जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांचा प्रताप:
रिपोर्टर: नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी यांनी सतत मोबाईल वर गेम खेळणे, सतत वर्गाबाहेर राहणे, विदयार्थ्यांना आर्वाच्य भाषेत बोलणे यासारख्या अनेक शहरवाशीयांच्या तक्रारीवरुन शिक्षण विभागाने प्रशालेतील 11 शिक्षकांवर कारवाई करीत त्यांची कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात आली आसल्याचे पत्र मुख्याध्यापक यांना मिळाले आसल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान शिक्षणाधिकारी यांनी या घेतलेल्या निर्णयामुळे नागरीकांतून समाधान होत असले तरी या शाळेतील विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये, त्यासाठी चांगल्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात यावे अशी मागणी ही सध्या शहरातून जोर धरत आहे.
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक हे विदयार्थ्यांना ज्ञानदान करण्यापेक्षा सतत शाळेत मोबाईलवर लुडो सारखे जुगारी खेळ खेळत बसणे, सतत मोबाईलवर वर्गाबाहेर येवून बोलत राहणे, विदयार्थ्यांशी आर्वाच्य भाषेत बोलणे, विदयार्थ्यांना व्यवस्थीत न शिकविणे अशा प्रकाराने कळस गाठला होता. दरम्यान या शिक्षकांच्या तक्रारी पार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, शिक्षणमत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदनातून शहरवाशीयांना तक्रार दिली होती. त्यावरुन शाळेचे मुख्याध्यापक बी एम जाधव यांच्यासह इतर दहा शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. कारण नळदुर्गची जिल्हा परिषद प्रशाला ही शिक्षकांच्या विविध प्रकारांनी गाजली आहे, या प्रशालेतील निगरगठठ शिक्षक व त्यांच्याकडून या शाळेतील विदयार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान यामुळे विदयार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते. त्यामुळे  गेल्या दोन वर्षापासून या शाळेतील शिक्षकांच्या सतत तक्रारी वरीष्ठांकडे जात होत्या पंरतु वरिष्ठांकडून कधी ही या शिक्षकांवर कारवाई होत नव्हती परिणामी शिक्षकांची मगरुरी वाढली त्यामुळे आम्ही विदयार्थ्यांना शिकविले काय किंवा नाही शिकविले तर आमचे कोणी कांही करु शकत नाहीत या अविर्भावात असलेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने केलेल्या या कारवाई मुळे चांगलीच चपराक बसली आहे. नळदुर्ग च्या जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक हे नळदुर्गला न राहता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आणि उमरगा याठिकाणी राहतात त्यामुळे या शिक्षकांना सकाळी प्रार्थनेला ही शाळेत लवकर येता येत नाही परिणामी कधी शाळेला यायचे तर कधी बुटटी मारायची अशी सवय या शाळेतील शिक्षकांना लागली होती त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे पंरतु वरीष्ठांकडून या शिक्षकांना पाठीशी घातले जात होते त्यामुळे या शिक्षकांची मगरुरी मोठया प्रमाणात वाढली होती. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी शिक्षण विभाग उस्मानाबाद यांनी जिल्हा परिषद प्रशालेतील एकूण अकरा शिक्षकांवर ही कारवाई केली असून या शिक्षकांची कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करुन त्यांना मोठी चपराक दिली आहे.
दरम्यान गेल्या दीड दोन वर्षापासून  सतत च्या नागरीकांच्या तक्रारी वरुन शिक्षणविभागाने या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना त्यांचा अहवाल मागितला होता आणि संबंधीत शिक्षकांकडून गेलेला अहवाल हा समाधान कारक नसल्याने मंगळवा दि. 17 सप्टेबर रोजी कायमस्वरुपी वेतनवाढ बंद केल्याची नोटीस बजावण्यात आली असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या कायम स्वरुपी वेतनवाढ बंद च्या कारवाई मध्ये मुख्याध्यापक बी एम जाधव, जाधवर एस एल,व्ही टी भालके, बी व्ही गायकवाड, के ए शेख, बी एच सनगुंदी, ए ए लोहार, एस जी इनामदार, हन्नुरे,  ए झेड शेख,  व्ही डी पाटील आदी शिक्षकांवर कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या