आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांना मदत:

रिपोर्टर: कोल्हापूर ,सांगली येथील पूरग्रस्तांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांच्यावतीने लागणारे सर्व संसारोपयोगी साहित्य देवून मदत करण्यात आली.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पाठयवण्यात आलेल्या साहीत्यामध्ये तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, मीठ, शेंगदाणे, बिस्कीट, मेणबत्ती, काडेपेटी , कपडे ,नॅपकीन, टॉवेल, गहू, ज्वारी, पीठ ,तेल ,चहा पावडर, पांघरण्याची ब्लॅंकेट, बिसलेरी बॉक्सची गाडी ,औषधे इत्यादी पाचशे  कुटुंबांना १ महीना पुरेल  एवढे दैनदिनी लागणारे साहीत्या गाडीमध्ये भरूण पाइवण्यात आले.यावेळी
 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील,  प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील ,भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभिराम सुधीर पाटील यांची उपस्थिती होती.
हे पाठवण्यात आलेले साहीत्या भागिरथी परिवाराचे सदस्य अक्षय उंबरे, मयूर चालवते यांनी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक १६/८/२०१९ रोजी पोहोचून हे सर्व साहीत्य जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना सुपूर्त केले. व अप्पर जिल्हाधिकारी यांना सोबत घेऊन भागीरथी परिवाराच्या सदस्यांनी ते साहीत्य एका दिवसामध्ये गरजू परिवारापर्यंत पोहोचवीण्याचे काम केले.
 हा उपक्रम राबवण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी  परिवार यांच्या सदस्यांनी अहोरात्र प्रयत्न केले तसेच या कार्यक्रमासाठी खानापूर गावचे सरपंच अरुण गायकवाड, स्वप्नील पाटील, आशिष शेंद्रे ,मनोज देशमुख, सोम सुर्यवंशी,आप्पा गवळी ,मनोज जाधव, भोसले  ,जगताप,आदी उपस्थित होते.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या