बाळासाहेब भारस्कर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा- शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गणवेशात बदल

- चिमुरडयांच्या भाषणाने सर्व मंत्रमुग्ध - गुणवंतांचा केला सत्कार

रिपोर्टर: बोरगाव मंजू : बाळासाहेब भारस्कर हायस्कूल, म्हैसांग येथे भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुरडयांनी आपल्या भाषणांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष रूपराव पाटील यांनी ध्वजारोहण केले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. आठवीमधून पायल भुजाडे, समीक्षा लोडम, नववीमधून सिद्धी गावंडे तसेच दहावीतून प्रतिक्षा इंगळे आणि ओम दहातोंडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यंदा शाळेला ५० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे शाळेचा गणवेश बदलण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह होता. दहावीमध्ये शिकणारी नम्रता लोडम हिने आपल्या भाषणातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याचप्रमाणे दिव्या खराटे आणि नम्रता लोडम यांनी ३७० व ३७ ए या कलमावर आधारित सुंदर असे गीत सादर केले. त्यांना शाळेतील शिक्षिका सौ ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. अनुष शाळेतील विद्यमान उपाध्यक्ष इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालन गणित शिक्षक वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक बाजोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ वंदना गावंडे- पल्हाडे, शिक्षक सुनील मिश्रा सुरेश अबगड  श्री कोल्हे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सौ सुषमाताईकडून खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवस असलेल्या, दहावीमधील मयूर सवई आणि आठवीमधील ओम उंबरकार त्यांना उज्वल भविष्यासाठी सर्व मान्यवर मंडळींनी शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या