रिपोर्टर: मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे या परिवार संवाद कार्यक्रमात जमलेली गर्दी आणि कार्यक्रमाच्या ठिकानी येताच लोकांनी दिलेल्या घोषणा पाहुण राणाजगजितसिंह पाटील भावनिक झाले.आणि वडील डॉ.पदमसिंह पाटील यांच्याकडे पाहुण त्यांना अश्रू अनावर झाले.

कार्यक्रमाच्या वेळी राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील सत्तासंघर्ष लोकांच्या समोर मांडला.जिल्हयाचा विकास,येणा—या आडचनी प्रयत्न करूण ही लोकसभेला आलेले अपयश या बाबत आपल मत लोकांसमोर मांडताना राणाजगजितसिंह पाटील हे भावनिक झाल्याचे दिसले.राष्ट्रवादी पक्षात झालेली राजकीय जडन घडन
पहाता पक्षातंराचा झालेला निर्णय, डॉ.पदमसिंह पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये आसलेली मैत्री आणि नातेसंबंध या गोष्टी राणाजगजितसिंह पाटील यांना जमलेल्या लोकांना सांगताना आपल्या भावना आवरल्या नाहीत.त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांच्या वेगळयाच स्वभावाचे दर्शन आज लोकांना झाले.
0 टिप्पण्या