सुरेश पाटील यांची राष्ट्रवादीतुन लढण्याची इच्छा पुर्ण होणार का?

रिपोर्टर: एस,पी,शुगरचे चेअरमन सुरेश पाटील हे राष्ट्रवादी पक्षातुन विधानसभा लढण्यासाठी बारामतीची वारी करूण आल्याची चर्चा आहे.कुठल्याच पक्षात जास्त दिवस न राहणारे पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा संगळीकडे होत आहे.


विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने आयाराम गयाराम यांची संख्याही वाढलेली दिसत आहे.राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचे समजताच सुरेश पाटील यांनी भाजपाला सोडचिटटी दिली आहे.त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांचे व्यवसायातुन झालेले राजकीय विरोधक सुरेश पाटील हे विधानसभा लढवून आमदार होण्याच्या विचारात आहेत. मात्र सुरेश पाटील कुठल्या पक्षातुन निवडणूक लढवणार हे निश्चित नाही.तस पाहील तर सुरेश पाटील यांचा व्यवसायिक अभ्यास असला तरी त्यांची राजकीय कारकीर्द मात्र शुन्य आहे.राष्ट्रवादी पक्षामध्ये 5 ते सहा वर्ष शिवसेनेमध्ये 2 वर्ष आणि भाजपामध्ये एक वर्ष अशा प्रकारे कुठल्याही पक्षाच्या पदावर न रहाता पाटील यांनी एका पाठोपाठ पक्ष बदलले आहेत.त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी,वंचीत किंवा अपक्ष हे पर्याय पाटील यांच्याकडे आहेत.मतदार संघात जास्त जनसंपर्क नसल्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवणे हे सुरेश पाटील यांना आव्हान असुन वंचीत आणि अपक्ष हे पर्याय पाटील यांच्याकडे आहेत.त्यामुळे सुरेश पाटील यांना बारामतीची वारी पावणार का? हा प्रश्न आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या