गोरमाळे येथे राज्यस्तरीय सिताफळ लागवड व फळ बागेचे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम.
रिपोर्टर:  गोरमाळे ता बार्शी येथील मे मधुबन फार्म अँड नर्सरी यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सिताफळ लागवड व फळ बागेचे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. एक दिवसीय सिताफळ लागवड व फळ बाग व्यवस्थापन एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .

 या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातुन रत्नागिरी,नांदेड,सातारा,हैदराबाद व  मराठवाडा,विदर्भ आदी भागातून पुरुष व महिला यांच्यासह 100 च्या वर शेतकरी उपस्थित होते .कार्यक्रमसाठी  सिताफळ संघाचे माजी अध्यक्ष श्री नवनाथ कसपटे कृषी सहायक श्री गणेश पाटील महाग्रेप्स  चे श्री रवींद्र शिंदे प्रमुख पाहुणे पत्रकार गणेश गोडसे श्री बालाजी विधातेआदी उपस्थित होते .सिताफळ लागवड कशी करावी छाटणी कशी घ्यावी.लागवड केल्याचे नंतर त्याचे कुठल्या प्रकारे व्यवस्थापन करावे लागते.आपलं हंगाम लवकर सुरू होईल प्राथमिक स्थरावर होणाऱ्या चुका निदर्शनास आणून दाखवून दिल्या.एकंदरीतच गुणवत्ता पूर्ण रोपाची वाढ व त्याचे संगोपनात होणाऱ्या तांत्रिक  चुका वर प्रकाश टाकत बाळांनगर व एन एम के 1 हे तुलनात्मकदृष्ट्या कसे फायदेशीर आहे प्रक्रिया उद्योगात रबडी आइस्क्रीम विस्तृत क्षेत्रात संधी उपलब्ध आहे हे श्री कसपटे यांनी प्रशिक्षण देताना स्पष्ट केले.श्री पाटील यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली .दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमत शिवार फेरी घेऊन  तांत्रिक स्वरूपाची प्रात्यक्षिक करून शेतकरी वर्गाला माहिती देण्यात आली.त्याच बरोबर उपस्थितांना मधुबनफार्म मधील 42 प्रकारच्या सिताफळ प्रजातीची ओळख करून दिली.किड नियंत्रण व  या विषयावर श्री रवींद्र कसपटे यांनी तर जैविक कीड नियंत्रणवर श्री रवींद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार श्री प्रवीण कसपटे यांनी मानले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या