संत सेना महाराज भवनासाठी साठी दहा लाख निधी देणार - आमदार चव्हाण
रिपोर्टर:- तुळजापूर येथे होणाऱ्या संत सेना महाराज नावाने उभारण्यात येणाऱ्या इमारतीला 10 लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे आश्वासन आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दिले.
तुळजापूर येथे नाभिक सेवा समिती च्या वतीने श्री संत श्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी ह.भ.प.प्रकाश गवळी महाराज यांची किर्तनसेवा सम्पन्न झाली,यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील नाभिक बांधव यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी आमदार मधूकरराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार चव्हाण यांनी संत सेना महाराज यांच्या अध्यात्मिक महत्व मोठे आहे त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या इमारतीला आपण दहा लाख रुपये निधी देऊ असे घोषित केले. शासकीय पातळीवर कोणतेही काम असल्यास निश्चित मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना त्यांनी समाजाची अनेक वर्षापासून असणारी मागणी लक्षात घेऊन गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन मागणी करत असल्यामुळे यासंदर्भात नगरपालिकेचा ठराव घेऊन जागेचा प्रश्न तात्काळ सोडून त्यानंतर उभारणाऱ्या इमारतीसाठी देखील नगरपरिषद निश्चित मदत करेल असे ठोस आश्वासन नगराध्यक्ष कणे यांनी दिले. याप्रसंगी नागेश नाईक इंद्रजीत साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्सव समिती अध्यक्ष खंडू चौधरी,शहर अध्यक्ष रंगनाथ कावरे,रमेश दळवी,आकाश आपूणे,प्रितेश डाके,बंटी कावरे,आशुतोष राऊत,शिवाजी सुरवसे, बालाजी दळवी,सुनील राऊत,विष्णू दळवी,प्रमोद कावरे,खंडू पोफळे,संजय शिंदे,महेंद्र कावरे,मुकुंद शिंदे,धनु पवार,व्यंकटेश वाळके,अतुल चौधरी,आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या