चारा छावणी मंजूरीसाठी कळंब—बार्शी रोडवर पशुपालकांचा रास्तारोखो


   

रिपोर्टर:- कळंब तालुक्यातील पानगाव येथील चारा छावणीला मंजूरी मीळण्यासाठी परिसरातील पशुपालकांनी आपले लहान मोठे पशुधन रस्त्यावर उतरवून रास्तारोखो करत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला .
.
 तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला असुन अद्यापही विहीरी , तलाव, नद्या  कोरड्याठाक आहेत , कवळी पिके तर चक्क वाळुन चालली आहेत,जनावरांच्या चारा पाण्याचा भिषण प्रश्न पशुपालकांना भेडसावत असल्यामुळेच पानगाव येथील पशुपाल्रकांनी येडेश्वरी गुरुकुलम गोशाळा दुधाळवाडी या संस्थेच्या माध्यमातुन पानगाव येथील राज्य महामार्ग रस्त्यालगत आसणारी चारा छावनी जुलै महिन्या पासुन बंद आहे. तहसिलदार अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करूनही जिल्हा प्रशासन स्तरावरुन मंजूरी मिळत नसल्या मुळे ही चारा छावणी संस्थेने बिला अभावी केल्यास जनावरावर उपासमारीची वेळ येईल या भिती पोटी पानगाव , उमरा , परतापुर आणि परिसरातील  पशुपालकांनी चारा छावणी शेजारील राज्यमार्गावर जनावरांसह रास्ता रोको केला , यामुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती .
प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून येरमाळा मंडळ अधिकारी डि .एम . कांबळे , उपळाई / उमरा सज्जाच्या  गावकामगार तलाठी श्रीमती ए .डी . मोरे , पोलिस यांनी आंदोलन कर्त्या पशुपालकांना प्रशासनाकडे तुमच्या भावना तात्काळ पाठवू तुम्हास न्याय मिळेल असे सांत्वन केल्यामुळे आंदोलकर्त्यांनी आजचे आंदोलन तुर्तास मागे घेताना निवेदन देवून जिल्हा प्रशासनास दोन दिवसाचा अल्टीमेट दिला आहे , दोन दिवसात सदर चारा छावणीस मंजूरी न मिळाल्यास पशुधन जिल्हाधिकारी कार्यालसमोर बांधून आंदोलन करणार असल्याचा इशारा पानगावचे ग्रा. प . सदस्य विजयकुमार चव्हाण यांनी दिला तर  विलास पवार , परसराम बेडके , सुरेश पवार , तानाजी बेडके , वैजिनाथ बेडके आदि शंभराच्या वर निवेदनावरील स्वाक्षरी कर्त्या पशुपालकांनी या चारा छावणीस मंजूरी प्रशासनाने लवकरात लवकर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली , उमरा , परतापूर चे सरपंच दत्तात्र्य गायकवाड यांनी तर जिल्हा प्रशासनाने आता आमचा अंत पाहु नये , दोन दिवसात सदर चारा छावणीस मंजूरी न मिळाल्यास पशुधनाच्या चारा, पाणी संदर्भात वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला यामुळे पानगाव सह परिसरातील चारा छावणीबाबत पशुपालक आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्याने हा प्रश्न सध्यातरी प्रशासन स्तरावरून तात्काळ मंजूरी न मिळाल्यास पेटणार असल्याची तीव्र टोकाची भावना पशुपालकात निर्माण झाल्याचे चित्र आहे . यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी येरमाळा पोलिस स्टेशनचे सपोनि ए .बी . सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या