पत्नीच्या खुनाच्या आरोपातुन एकाची निर्दोश मुक्तता:
रिपोर्टर: पत्नीच्या चारिञ्यावर संशय घेवून गळा दाबुन ठार मारण्याच्या आरोपातुन परंडा तालुक्यातील एकाची भुम सत्र न्ययालयाने निर्दोश मुक्तता केली. सदर प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने 12 साक्षीदारांची साक्ष घेवून घटना आणि साक्ष यामध्ये विसंगती आणि आरोपीचे वकील अॅड.सुधाकर तांबे यांचा युक्तीवाद ग्राहय धरूण सदर प्रकरणाचा निकाल देण्यात आला.   

उस्मानाबद जिल्हयामध्ये परंडा तालुकतील पिठापुरी गावातील भगवान तरटे यानी 2012 सााली पत्नीच्या चारिञ्यावर संशय घेवून पत्नीला गळा दाबुन ठार मारले आशी फिर्याद कालम 302 नुसार परंडा पोलीसात दाखल झाली होती.तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.सदर खटल्याची सुनावनी भुम येथिल सत्र न्यायालयामध्ये झाली आसता. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे 12 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या मात्र सरकारी पक्षाच्या वतीने दाखवण्यात आलेला परस्थितीजन्य पुरवा आणि साक्षीदारांची साक्ष यामध्ये विसंगती आढळल्याने आणि आरोपीचे वकील सुधाकर तांबे यांचा युक्तीवाद ग्राहय धरूण भुम सत्र न्यायालयाने आरोपीची सदर गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली.सदर प्रकरणी आरोपीच्या वतीने अॅड.सुधाकर तांबे,यांनी काम पाहीले तर
अॅड.एच.एन.वाघमोडे,अॅड.बी,यु.मोटे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या