उस्मानाबाद जिल्हयातील भुम या ठिकाणी उभारण्यात आलेल्या औदयोगिक वसहातीमध्ये छोटे,मोठे व्यवसाय चालतात.परंतु त्यांना मुलभुत सुविधा नसल्याने व्यचसाईकांना आडचनीचा सामना करावा लागत आहे. रात्र दिवस चालणा—या व्यवसायासाठी कामगारांना रात्री बे रात्री कामावर यावे लागते या साठी इतर सुविधा बरोबरच या ठिकानी लाईट आसने ही आवशक आहे.महीला कामगारांसाठी सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आसल्यामुळे रस्त्यालगत लाईट आसने फार महत्वाचे आहे.परंतू या ठिकानी लाईट नसलयाने चो—या, ही होण्याचे प्रमाण वाढले आहे.व्यवसाईकांच्या आणि कामगार लोकांच्या आडचनी लक्षात घेवुन शिवसेनेचे जिल्हासहसंसपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांनी लातुर येथिल महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लाईट बसवण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
0 टिप्पण्या