सुमारे दोन लाखांची अत्यावश्यक औषधी रवाना
रिपोर्टर: तुळजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आवश्यक औषधी मदतीच्या स्वरुपात पाठविण्यात आली.
महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले आहे. यामुळे हजारो लोक बाधित झाले आहेत. यात अनेक लोक जखमी तसेच आजारी पडले आहेत. तसेच त्या परिसरात साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे.
या संकटातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तुळजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सदर पूरग्रस्त आणि बाधित नागरिकांना औषधी पुरवठा करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला. त्यानुसार रविवार दि. ११ रोजी शहर आणि तालुक्यातील विविध औषधी विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक औषधींचे संकलन करून ते पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले.
यात विविध प्रकारच्या अत्यावश्यक औषधींचा समावेश आहे. सुमारे दोन लाख रुपयांची औषधे तुळजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनद्वारे रवाना करण्यात आली.
या औषधी संकलनासाठी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष किरण हंगरगेकर, तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकम, शहराध्यक्ष बाबासाहेब(बप्पा)कदम, तसेच औषधी विक्रेते रोहीत नाईकवाडी, आकाश मिसाळ, विश्वजीत पवार, प्रशांत संकपाळ, सतीश पाटील, मनोज शिलवंत आदींनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या