आपसिंगा ग्रामपंचायत अपंग निधीचा खर्च करेना, अंध तुकाराम रोकडे करणार जि.प.समोर उपोषण:


रिपोर्टर: तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली गोरे आणि त्यांचा पुतण्या ग्रामसेवक चेैतन्य गोरे हे संगनमताने अंपंगासाठीच्या ५ टक्के निधीचा विनियोग करत नसून,विचारणा केल्यास धमकावत असल्याचा आरोप करुन ग्रामसेवक गोरे यांची अन्यत्र बदली करावी,अपंग निधी खर्च करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत दोन्ही डोळ्यांनी अंध तुकाराम रोकडे यांनी १७ सप्टेंबर १९ रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे.
तुकाराम रोकडे यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आनंद नगर पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने ,दि.२५ जून २०१८ रोजी पंचायत राज संस्थांनी आपल्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधी आपल्या क्षेत्रातील अंपंगाच्या कल्याणासाठी खर्च करावा, असे परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार मी आपसिंगाच्या सरपंच वैशाली शंकर गोरे व त्यांचा याच गावात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेला ग्रामविकास अधिकारी चैतन्य गोरे यांना भेटून ,मी अंध असून,लहान मुलगा आहे, मला ग्रामपंचायतीकडून काहीतरी निधी/मदत द्यावी अशी मागणी केली असता, मला उडवाउडवीची भाषा करुन हाकलून दिले.याबाबत मी २६ जून १९ रोजी उस्मानाबाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देवून आपसिंग ग्रामपंचायतीला अपंगासाठीचा निधी खर्च करावा,ग्रामविस्तार अधिकारी गोरे याची अन्यत्र बदली करावी आदी मागणीचे निवेदन दिले होते,त्यावर आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही म्हणून मी,दि.२० ऑगस्ट १९ रोजी हे निवेदन दिले आहे.या ग्रामविकास अधिकार्‍याची इतरत्र तात्काळ बदली करावी,ग्रामपंचायतीस अपंगासाठीचा गरजूंसाठी निधी खर्च करण्यास आदेशित करावे आदी मागण्यंाचा समावेश आहे.या मागण्यांचा दि.१६ सप्टेंबर १९पर्यंत विचार नाही केला तर मी मराठवाडा मुक्ती संंंग्राम वर्धापन दिन दि.१७ सप्टेंबर १९ रोजी उस्मानाबाद जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे नमुद असून,तुकाराम रोकडे यांनी राज्यातील अंपंगांंनी ग्रामपंचायतींना आपल्यासाठीचा निधी खर्च करण्याची मागणी करावी,जिल्ह्यातील अपंगांंनी या लाक्षणिक उपोषणात सामीला व्हावेे असे आवाहन केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या