महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य अपघाताची शक्यता
बोरगाव मंजू
रिपोर्टर: राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या जीवघेण्या खड्डे वाचविण्यासाठी वाहन चालवताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय वाहनांची बिघाड होत आहे. त्यामुळे नाहक वाहन चालकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित विभागाने लक्ष वेधून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते मूर्तीजापूर महामार्गावर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय सोनेरी. काटेपूर्णा नदीच्या पात्रावरील पुलावर छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय सतत अल्प पावसाच्या सरी येत आहे. त्यामुळे खड्डे जलमय झाल्याने वाहन चालवताना चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे नदी पात्रावरील पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी वाहने, छोट्या मोठ्या वाहन चालवताना चालकाला नाहक त्रास होत असुन तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन उपाययोजना करावी अशी  सर्व सामान्य जनते सह वाहन चालकांत बोलल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या