रिपोर्टर: पुर्वी मी उस्मानाबाद मध्ये काम केलेले आहे या जिल्हयात मला कामाचा चांगला अनुभव आहे. त्याच अनुभवातुन प्रेरणा घेवुन परत या जिल्हयात चांगले काम करणार असल्याचे नविन पोलीस अधिक्षक राज तिलक रौशन यांनी पदभार स्विकारून मावळते एस,पी,आर राजा यांना निरोप देताना सांगितले.
जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये मावळते पोलीस अधीक्षक आर.राजा यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उस्मानाबादचे नविन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन (भा.पो.से.) यांनी नागपुर येथुन येवुन या पदाचा कारभार स्वीकारला.मावळते पोलीस अधीक्षक आर.राजा यांची उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे बदली झाली आसुन त्यांना उस्मानाबाद पोलीस विभागाच्या वतीने शाल-श्रीफळ व भेटवस्तु देवुन राज तिलक रौशन, यांच्या हस्ते निरोप देण्यात आला. तर मावळते पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी शाल-श्रीफळ देवुन राज तिलक रौशन यांचे स्वागत केले. राज तिलक रौशन हे सहायक पोलीस अधीक्षक म्हणुन उस्मानाबाद जिल्हयात तुळजापूर उपविभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांना हा जिल्हा परिचीत आसल्याने त्याच अनुभवावर जिल्हयात चांगले काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या