विठ्ठलसाईचे:आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते रोलर पूजन:रिपोर्टर: मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे सन २०१९-२० मधील गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम शनिवारी २४ ऑगस्ट रोजी राज्याचे माजी मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन आमदार बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले...
यावेळी बोलताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की चालू हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी कारखाना प्रशासनाकडून पुरेशी तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येत आहे तसेच मशिनरी व ओव्हर ऑईलिंग आणि दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे असे सांगून अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालू असून येणारा गळीत हंगाम २०१९- २०  सुद्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली...यावेळी रोलर पूजन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बापूरावजी पाटील,आळंद चे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव पाटील, विठ्ठल साई साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन सादिक काझी,संचालक केशवराव पवार, विठ्ठलराव पाटील, शरण आप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, शिवलिंग माळी, दिलीप भालेराव, कार्यकारी संचालक एन बी अथणी, उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमास प्रमोद कुलकर्णी, आप्पासाहेब हळ्ळे गोविंद पाटील, मुरूम चे उपनराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, महालींग बाबशेट्टी, सुजित शेळके,यांच्यासह विठ्ठल साई साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या