नुकताच पास झालेल्या ट्रिपल तलाकच्या कायदयानुसार उस्मानाबादेत डॉक्टरवर गुन्हा दाखल:रिपोर्टर: आपल्या पत्नीला मोबाईल वरूण व्हॉटसॉपच्या माध्यमातुन तिनदा तलाक लिहून मॅसेज करण्या—या उस्मानाबाद येथिल डॉक्टर शफी मुजावरच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आसुन कायदा पारीत झाल्यापासुनचा हा जिल्हयातील पहीलाच गुन्हा आसल्याचे दिसत आहे.

आगदी काही महीण्यापुर्वीच केंद्र सरकारणे मुस्लीम महीलांच्या हिताचा ट्रिपल तलाख हा कायदा पास केला आहे.मुस्लीम महीला वि​वाह हक्क संरक्षण कायदा 2019 आशा प्रकारे या कायदयाची आमंलबजावनी करण्यात आली आहे. या कायदया नुसारच उस्मानाबाद मध्ये पत्नीचा छळ करण्या—या मुस्लीम डॉक्टर विरोधात दि.22 आॅगस्ट रोजी महत्वाचे म्हणजे महीला देखील डॉक्टर आसल्याने लवकरात लवकर या  प्रकरणाला कायदेशीर वळण लागले आहे.
डॉक्टर महीलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 7 मे 2005 रोजी मुस्लीम रिवाजा प्रमाणे वडिलांनी लग्न लावून दिले होते.लग्न झाल्या नंतर दोन वर्ष व्यवस्थित सांभाळ करण्यात आला.परत मात्र कौंटोबिक हिंसाचार करणे,विवाह भाहय संब्ंध ठेवणे या कारणामुळे गैरसमज होत गेले.घरच्यांनी आणि नातेवाईकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु प्रकरण मिटले नाही. 6 जानेवारी 2019 रोजी इंग्रजी भाषेमध्ये मोबाइलच्या माध्यमातुन तिन वेळा तलाक लिहुन मॅसेज करण्यात आला.केलेल्या मॅसेजमध्ये शिवीगाळ ही करण्यात आला होती. या संगळया कारणामुळे उस्मानाबाद येथिल आनंदनगर पोलीसात डॉक्टर शफी मुजावरच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या