तुळजापुर तालुक्यातून पुरग्रस्थाना ४ टन धान्याची मदत
तुळजापूर रिपोर्टर:

पंचायत समिती तुळजापुर आणि आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर व सांगली येथील महापूर आपत्तीग्रस्तांना धान्य आणि दैनंदिन वस्तू सगळीकडे पाठवण्यात आली. सर्वपक्षीय तालुक्यातील  पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे साहित्य पाठविण्यात आले.

आपत्तीमध्ये असणाऱ्या नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मंगळवार २१ ऑगस्ट रोजी वाहनातून सांगलीला पाठवून देण्यात आले.  या वाहनाचे पूजन आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प. स.सभापती शिवाजी गायकवाड, प. स.सदस्य शिवाजी गोरे, आ. स. मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, भाजपा सोशल मिडिया तालुका अध्यक्ष सागर पारडे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष आनंद कंदले, छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, स्वीय सहाय्यक बबन जाधव,काँग्रेस  अध्यक्ष भारत कदम, शिवसेना नेते सुधीर कदम, आमीर शेख, राजेंद्र जाधव,  भाजपचे नेते संदीप गंगणे, एन. सी. आय बी. राज्य जनसंपर्क अधिकारी संजय कुमार बोदर, गटविकास अधिकारी मोहन राऊत, संपर्कचे जिल्हाप्रतिनिधी अनिल आगलावे,  प्रशासन अधिकारी विजय देशमुख, सारिका दराडे, आरोग्य अधिकारी बाबा मुंढे ,शंकर पाळेकर , श्रीमती कल्पना शिंदे, श्रीमती कौशल्या सरडे,श्रीमती राठोड, लेखापाल राठोड, पत्रकार संजय गायकवाड, संपादक श्रीराम क्षीरसागर, राहुल कोळी, कु. किरण चौधरी, दीपक थोरात, सुहास फंड, आदींची उपस्थिती होती.

यामध्ये तांदूळ, ज्वारीचे पीठ ,गव्हाचेपीठ,मीठ,चटणी,साखर  ,चहापावडर,साबण,मिडिक्लोअर,डेटॉल,साडी ,परकर, टीशर्ट ,बरमुडा ,नाईट पॅन्ट,इत्यादी साहित्य एकत्र करून देण्यात आले.

यावेळी प्रशासकीय कर्मचारी,तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व आमदार संवाद मंच चे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या