सोनवणे यांचा नवनाथ वाचनालयच्यावतीने सत्कार


रिपोर्टर-महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवेण यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल उंबरे कोठा येथील नवनाथ सार्वजनिक वाचनालय व वाचक यांच्यावतीने सोनवणे यांचा शाल, फेटा, हार व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण व कृषीतज्ञ अशोक उंबरे, वाचनालयाचे सचिव माकिण इंगळे, प्रा. चंदन नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम, अमोल वाघमारे, अमोल बोबडे, कैलास अंबेकर, अमोल वाघमोडे व बोंबले हनुमान चौकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या