डॉ.संदीप तांबारे यांचा लोकराज्य पुरस्काराने सन्मान: पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या हस्ते गौरव.


रिपोर्टर:-शासनाच्या लोकराज्य मासिकाच्या जनजागृतीचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल, यश मेडिकल फाऊंडेशने अध्यक्ष तथा येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांना दि.15 अॉगस्ट 2019 रोजी राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकराज्य पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे.
    पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था,शाळा, महाविद्यालये व व्यक्तींना लोकराज्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.ज्या सामाजिक संस्थांनी,शाळांनी,महाविद्यालयांनी,व्यक्तींनी  शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या जनजागृतीकरिता झोकून देऊन काम केले आहे. अशा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये येरमाळा येथील यश मेडिकल फाउंडेशन व येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांना लोकराज्यदूत म्हणून गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या