उस्मानाबाद येथिल एकता फाऊंडेशन लोकराज्य पुरस्काराने सन्मानित
   रिपोर्टर: विविध सातत्याने समाजपयोगी उपक्रम घेत असलेल्या एकता फाऊंडेशन उस्मानाबाद या संस्थेला महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने देण्यात येणारा लोकराज्य संस्था हा पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंञी मा.तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी मा.दिपा मुधोळ- मुंडे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
          एकता फाऊंडेशन या संस्थेने उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा.दिपा मुधोळ- मुंडे व अपर जिल्हाधिकारी मा.पराग सोमण यांच्या संकल्पनेतुन व जिल्हा माहिती आधिकारी मा.मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे मुखपञ असलेल्या लोकराज्य मासिक च्या जनजागृती व वाटप करत असल्याबदल संस्थेला सन 2018-19 चा लोकराज्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
          यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, नवनाथ जाधवर, सनी मुंडे, श्रीनिवास मुंडे, सचिन बारस्कर, यशवंत लोमटे व आदित्य लगदिवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या