राज्य पूरग्रस्त तर लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही दुष्काळ - आ.बसवराज पाटील: काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेटरिपोर्टर:: सह्याद्री अतिथीगृहात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आ. बसवराज पाटील यांनी राज्यातील पूरग्रस्त भागातील समस्यांबरोबरच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती ही दुष्काळही आहे आणि काही भागात पुरही आहे अशी विचित्र असल्याकडे मा.मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले. आ. बसवराज पाटील यांनी सांगितले की पूरग्रस्तांना मदत जाहीर करतांना या दोन जिल्यातील दुष्काळही विचारात घेऊन मदत जाहीर व्हावी.

सदर शिष्टमंडळात काँग्रेस प्रांताध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार,माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष आ. बसवराज पाटील,मुजफ्फर हुसेन,आ.नितीन राऊत,नाना पटोले,आ.शरद रणपिसे,आ. विरेंद्र जगताप,आ.हुस्नबानो खलिफे,आ.नसीम खान, कृपाशंकर सिंह,सचिन सावंत, पृथ्वीराज साठे,चारुलता टोकस, आ.हुस्नबानू खलिफे आदी नेत्यांचा समावेश होता.
काँग्रेस प्रांताध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पूरग्रस्तांचे पुनर्वसन व मदती संदर्भात मागण्यांचे निवेदन सादर करतेवेळी प्रमुख मागण्या वाचुन दाखवल्या व त्यावर सर्वांनी चर्चा केली. यामध्ये पूरग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन, पुरामुळे बेघर झालेल्यांना घरे बांधुन देणे, शेतकऱ्यांना - व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देणे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना मदत, पशुधन नुकसानभरपाई रोख रक्कम देणे अशा प्रमुख मागण्या या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या