येडेश्वरी गुरुकुलम गोशाळे कडुन पुरग्रस्त पशुधनासाठी सुख्या चाऱ्याची मदत:


रिपोर्टर:तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी गुरूकुलम गोळाच्या माध्यमातुन पुरग्रस्त पशुधनाच्या चाऱ्याचा विचार करून संस्थेचे सचिव रंगनाथ नाना दुधाळ यांनी सुखाचारा, कडब्याचे भरलेले टंम्पो , पिकअप जिल्हाधिकारी दिपा मुधोळ / मुंडे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून कोल्हापूरकडे रवाना किले .
 पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर , सांगली येथील महापुराच्या संकटामुळे पूर्ण जनजिवन विस्कळीत झाले असून पशुधनही मोठ्या संकटात सापडले असुन त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न ध्यानात घेवून येरमाळा बालाघाटाच्या कुशीत वसलेल्या दुधाळवाडी गावचे रहिवाशी रंगनाथ नाना दुधाळ हे परिसरातील पशुधन जतन व्हावे म्हणून दुधाळवाडी येथे येडेश्वरी गुरूकुल नावाने गोशाळा अनेक दिवसापासुन चालवितात . याच संस्थेच्या माध्यमातुन मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे येथील दहिफळ , पानगाव परिसरातील पशु पालकांनी त्यांना साकडे घालुन चारा छावण्या सुरु करण्यास लावल्या आहेत . अशा पशु प्रेमी दुधाळ यांनी पुरग्रस्त पशुधनांच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेवून तेथील पशुधनासाठी सुखाचारा कडब्याचे टेंम्पो ,पिकप वाहाने भरून जिल्हाधिकारी कार्यालया समोरून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ / मुंडे यांच्या उपस्थितीत या पशुधनाच्या चाऱ्याची मदत कोल्हापूर सांगलीकडे रवाना केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या