राजीनाम्याच्या खोटया बातम्या बद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रसिध्दी पत्रक:रिपोर्टर: आमदारकीच्या राजीनाम्याच्या बद्दल सोशल मिडीयामध्ये देण्यात आलेल्या बादम्या तथ्यहीन आसल्याचे सांगत राजनाम्याचा कसलाही विषय नसताना विनाकारण जनतेची दिशाभूल करण्याच्या हेतुने आशी वृत्त पसरवली जात आसुन या बातम्यावर कसल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये असे पत्रक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले आहे. 
राज्यातील कोल्हापूर, सांगली ,कोकण आदी भागातील नागरिक अभूतपूर्व आशा पूर परिस्थितीमुळे मोठया संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यात बहुतांश भागात अल्पपर्जन्य झाल्याने नागरिक तीव्र दुःष्काळाचा सामना करत आहेत. या कठीण कालखंडात समाजातील सर्वच घटकांनी जबाबदारीने वागणे, संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना दिलासा देण्यासाठी आपली शक्ती खर्च करणे अपेक्षित असते.अशा गंभीर परिस्थितीत कांही माध्यमातून आज मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याच्या निखालस खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. सोशल मीडियात देखील हाच प्रकार केला जात आहे.

तेरणा ट्रस्टच्या माध्यामातून पूरग्रस्त भागातील कांही गावांना दत्तक घेण्यात येणार आहेत व त्याअनुषंगाने आम्ही मदत करण्याचे नियोजन करत आहोत. अशा परिस्थितीत माझ्या फेसबुक पेजवर ईद निमित्त शुभेच्छेच्या पोस्टवर माझ्या नावापुढे "आ."असा उल्लेख नसल्याचे सांगत मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याच्या तथ्यहीन बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. ज्यांनी कोणी सदर बातमी प्रसिद्ध केली त्यांनी ती करण्या अगोदर मला एक फोन करून विचारलं असत तर त्याची सत्यात समोर आली असती. किंवा यापूर्वीच्या माझ्या फेसबुक पोस्ट पाहण्याची तसदी घेतली असती तर त्यातील अनेकांवर माझा "आ." उल्लेख नसल्याचे दिसून आले असते. मात्र सर्व घटनाक्रम पाहता याप्रकारे तथ्यहीन बातम्या पसरवून कोणी तरी याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असं वाटत.

असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, यापूर्वी देखील हे मी स्पस्ट केले आहे. मी जे करत असतो ते उघड करत असतो. माझं राजकारण नेहमीच समाजहितासाठी असतं हे सर्वश्रुत आहे. राजकारण करत असताना मी जे निर्णय घेत असतो ते नेहमी जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी असतात व सर्वांशी चर्चा करून घेतलेले असतात. त्यामुळे यापुढे देखील जे जिल्ह्यातील जनतेच्या हिताचं असेल तेच करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तरी सर्वांनी अशा खोट्या व तथ्यहीन बातम्यांवर विश्वास ठेवू नये.

-- राणाजगजितसिंह पाटील

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या