अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांना भरघोष मदत:रिपोर्टर: श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), सांगली व कोल्हापूर  जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरीकानासाठी धावून गेले आहेत. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळा कडून एक लाख पाकीट खाद्यपदार्थमध्ये बिस्कीट पुडे, ५२ हजार नग (३६१ बॉक्स), चिवडा पाकीटे २० हजार ५०० नग (११४ बॉक्स),  चिवडा पोते एक हजार पुडे (१० पोते), व्हील स्नँक्स पुडे ४ हजार पुडे (३३ बॉक्स), उपवासाचे फराळी चिवडा पोते ३ हजार पुडे (४ पोते), पिण्याच्या पाण्याच्या ११ हजार बाटल्या (९०० बॉक्स) यासह आवाहनास देखील उत्सफूर्त प्रतिसाद तालुक्यातून मिळाला असून सुमारे ५ ट्रक सांगली व कोल्हापूर कडे रविवारी रवाना झाले.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळच्या प्रांगणात न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व औरंगाबादचे वरिष्ठ न्यायाधीश आशिष आयचित यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करून सांगली व कोल्हापूरकडे रवाना झाली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपसण्याचे काम याही वेळेस केले आहे. यापूर्वी दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी राज्यासह परराज्यात आपत्तीच्या वेळी मदतीला धावून गेले आहे. सध्या सांगली व कोल्हापूर  येथे पूर परिस्थिती आहे. या ठिकाणच्या नागरिकांना न्यासासह प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी तालुक्यातील नागरिकांना मंडळाची वाहने जाणार असल्याने पूरग्रस्त बांधवांसाठी आणखी काही मदत पाठवायची असल्यास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संपर्क साधण्याचे आवाहन केल्याप्रमाणे यास विविध ठिकाणाहून मदतीचा ओघ प्राप्त झाला.

यामध्ये हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेकडून सँनेटरी नँपकीन ६०० नग (५ बॉक्स), व्हिक्स गोळ्या १ हजार, ५ जार, छोट्या व्हिक्स डब्या ३०० नग व मोठ्या ३०० नग, मोठे डब्बे ८० नग, व्हिक्स इनवेलर ४० नग, व ग्राम पंचायत सांगावी (बु) व ग्रामस्थ यांच्याकडून पारले बिस्कीट २६७४ नग (१९ बॉक्स), पाणी बॉटल २७६ नग (२३ बॉक्स), फरसान  ४ किलो, कुरकुरे २०० पुडे (२ बॉक्स), अक्कलकोट नजीक असलेल्या समर्थ नगर ग्राम पंचायत हद्दीतील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांच्या कडून चार पोते तांदूळ, न्यासाच्या सुरक्षा विभागातील राजू पवार ५ बॉक्स पाणी बॉटल, बालाजी क्लार्थ स्टोर्स रणसुभे यांच्याकडून लहान- मोठे, मुलांचे व मुलींचे यासह पुरुष महिलांचे २ हजार ५०० कपडे यासह बिस्कीटचे २ बॉक्स देण्यात आले.

बावकरवाडी ग्रामस्थाकडून १ पोते ज्वारी, २ पोते गहू, १ पोते तांदूळ, १ किलो दाल, मिठ ८ पाकीट, बिस्केत ८ पाकीट, साड्या १२ नग यासह न्यासाच्या प्रांगणातील उपहारगृह राठोड यांच्याकडून ५ बॉक्स पाण्याचे बॉटल्स, शांतप्पा कलबुर्गी यांच्याकडून ३ बॉक्स कुरकुरे देण्यात आले.
तर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सतीश बिराजदार यांना नुकतेच न्यासाकडून उतकृष्ठ वैद्यकीय सेवेबद्दल पुरस्कार व रक्कम ५ हजर ५०० चा धनादेश देण्यात आलेला होता, तो त्यांनी तितक्याच रक्कमेच्या पाण्याचा बॉटल्स घेवून दिल्या.

अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे विपुल कदम यांनी २० बॉक्स पाणी तर न्यासाचे चालक बलभीम पवार यांनी समर्थ पवार यांच्याकडून ५ बॉक्स पाणी, याबरोबरच न्यासाचे वाहन क्र. एम.एच.१३ ए.डी.०००५ च्या चालक व कर्मचार्याकडून ४४० पाण्याचे बॉक्स, बिस्किट्स ११८ बॉक्स, चिवडा फराळी ४५ बॉक्स, कुरकुरे १३ बॉक्स, चिवडा पाकीट १ पोते व वाहन क्र. एम.एच.०७ ए.जे. ५६७५ च्या चालक व कर्मचार्याकडून १४४ पाण्याचे बॉक्स, बिस्किट्स ११३ बॉक्स, चिवडा फराळी २५ बॉक्स, चिवडा पाकीट २ पोते आणि वाहन क्र. एम.एच.१३ बी.एच. ५६७५ च्या चालक व कर्मचार्याकडून ३११ पाण्याचे बॉक्स, बिस्किट्स १२६ बॉक्स, चिवडा व फराळी ३० बॉक्स, कुरकुरे १० बॉक्स, चिवडा पाकीट १ पोते, सँनेटरी नँपकीन ५ बॉक्स, व्हिक्स गोळ्या ५ जार, छोट्या व्हिक्स डब्या २३ डझन, व मोठ्या व्हिक्स डब्या २२ डझन, मोठे डब्बे ७८ नग, व्हिक्स इनवेलर ४० नग आदी साहिती घेवून न्यासाचे पदाधिकारी कर्मचारी, सेवेकरी व अमोलराजे भोसले मित्र परिवार सांगली व कोल्हापूर कडे रवाना झाले.

याप्रसंगी बोलताना न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले म्हणाले, सांगली व कोल्हापूर  जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरीकानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आवाहानास प्रतिसाद देत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत आवश्यक ते साहित्य पाठवून देण्यात आले आहे. आणखीन औषधोपचारा करिता देखील मदत करण्यात येणार आहे. यासाठी अशीच करावयाची झाल्यास न्यासास संपर्क साधावेत असे आव्हान केले आहेत.

प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले म्हणाले, सांगली व कोल्हापूर  जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरीकानासाठी स्वत: टीम सोबत गेलो, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी तेथील सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील पथक प्रमुखांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्द करून दिले आहेत, त्यांच्याशी संपर्क करून सर्व साहित्य पोहोचविण्याच्या सूचना आहे. त्या पद्धतीने पोहचविण्यात येणार आहे.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, लाला राठोड, लक्ष्मण पाती, आप्पा हंचाटे, संतोष भोसले, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, भजनी मंडळ शहर अध्यक्ष सुरेश जाधव, दीपक पोतदार. स्वप्नील मोरे, अनिल पवार, काशिनाथ पोतदार, पद्माकर डीग्गे, प्रविण देशमुख, शीतल फुटाणे, राजू नवले, धनंजय बणजगोळे, मनोज अतनुरे, किरण पाटील, मनोज निकम, चंद्रकांत कुंभार, संजय गोंडाळ, राजू माकणे, अमित थोरात, सुरेखा कोळी, सुजाता टमके, गणेश भोसले, रोहीत खोबरे, सतीश महिंद्रकर, प्रविण घाडगे, महांतेश स्वामी, सिद्धाराम पुजारी, बाळासाहेब घाटगे, शहाजी यादव, गोटू माने, वैभव मोरे, आकाश गडकरी, अतिश पवार, स्वामिनाथ बाबर, बाळा पोळ, नामा भोसले, अशोक कोळी, प्रकाश गायकवाड, सिद्धाराम कल्याणी, राजू पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, अमर पोतदार, पैलवान झिंगाडे, सी.ए.भोसले, पंकज डीग्गे, निखील पाटील, पिंटू दोड्डमनी, मुन्ना कोल्हे, स्वराज घाटगे आदीजणासह न्यासाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी व अमोलराजे भोसले मित्र परिवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या