नळदुर्ग येथे राज्यस्तरीय ज्ञानकिरण समाज गौरव पुरस्काराचे आ.चव्हाण यांच्या हस्ते वितरण

रिपोर्टर: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अणदुर यांच्या वतीने राज्यस्तरीय ज्ञानकिरण समाज गौरव पुरस्काराचे शुक्रवारी (दि.९) शानदार कार्यक्रमात वितरण करण्यात आले.
येथील अतिथी हॉल सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे उपकुलसचिव उत्तमराव जाधव, पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ शेरखाने, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. के. वानखेडे, विकास गायकवाड, नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, कला व आरोग्य क्षेत्रावर आपल्या कार्य कर्तृत्वाची मोहर उमटविणाऱ्या राज्यातील व्यक्तींना कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र प्रदान करून राज्यस्तरीय ज्ञानकिरण समाज, शिक्षण, साहित्य व पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उत्तम जाधव, शिवाजी गायकवाड, यशवंत कुर्वे, विठ्ठलराव वरुडे-पाटील, वैशाली देशमुख, नानासाहेब घोडके, मोहसीन खान बिस्मिल्ला खान, मनीषा शिताई, बबन भालके, डॉ. रमा आनंद मोरे, संजीवनी कदम, अनुजा कल्याणकर, प्रकाश पिंपळकर, कृष्णा गायकवाड, संजय कोथळीकर, वैशाली भोसले, रावसाहेब देशमुख, प्रा. सुभाष माने, रमेश दुधभाते, माधव धुळे, डॉ. अशोकराव मोहेकर, प्रा. अशोक पापडे आदींना राज्यस्तरीय ज्ञान किरण पुरस्कार २०१९ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.पत्रकार धनंजय रणदिवे, सभापती शिवाजी गायकवाड, उत्तमराव जाधव, विठ्ठलराव बोरुडे- पाटील आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे तर सूत्रसंचालन प्रा. विवेक कोरे यांनी केले. कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत कदम, पत्रकार संजय खुरूद, उमाजी गायकवाड, शिवशंकर तिळगुळे, निजाम शेख आयुब शेख, चंद्रकांत कांबळे, केंद्रप्रमुख अरुण अंगुले, संभाजी कांबळे, एस. के. गायकवाड, दादासाहेब बनसोडे, अरूण लोखंडे आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या