रिपोर्टर: उस्मानाबाद येथिल नगरसेविका सौ.प्रेमाताई पाटील यांच्यासह शहरातील महीलांकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाचे औश्चित्य साधुन मोठया संख्येने राख्या पाठवण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद: नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. प्रेमाताई पाटील यांच्यावतीने उस्मानाबाद शहरातील १००० महिलांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राख्या पाठवल्या आहेत. सोबतच एका पत्राद्वारे महिलांनी आपल्या विविध समस्या ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या आसून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर (अण्णा) पाटील यांच्या प्रेरणेतून जिल्हाभरातून विविध महिला मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील अशा वर्कर्स स्वप्नील पाटील, के.पी पाटील यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या