स्वआधार मतीमंद प्रकल्पामध्ये 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा:


रक्षाबंधन केले साजरे 

रिपोर्टर: तुळजाई प्रतिष्ठाण संचलीत स्वआधार मतिमंद प्रकल्पामध्ये 15 आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन काळे महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी सदस्य,एस,टी,महामंडळ कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मधुकर अनभुले,श्रीराम क्षीरसागर संपादक महाराष्ट्र लाईव्ह तथा जिल्हा प्रतिनिधी न्युज नेशन राष्ट्रीय चॉनल,महाराज विनोद विर आळणीकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतीमा पुजन करूण मान्यवरांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्वआधार ग्रहातील मतिमंद मुलींनी झाडाच्या बियापासुन बनवलेल्या प्रदुषण मुक्त राख्या रक्षाबंधनानिमीत्त मान्यवरांना बांधण्यात आल्या. त्याच बरोबर मान्यवरांच्या हास्ते प्रकल्पातील विदयार्थ्यांना खावुचे वाटप करण्यात आले.यावेळी स्वआधार मतिमंद प्रकल्पाचे मुख्यध्यापक गुरूनाथ थोरसडे,भरत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षीका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सोनाली मिटकरी यांने केले तर आभार सौ.वैशाली पोपळे चौधरी यांनी मानले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या