वाशी,पारगाव येथे कलम 370 हाटवल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोश:रिपोर्टर: देशातील महत्वाचा कलम 370 चा प्रश्न भाजपा सरकारने मार्गी लावल्याने उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोश साजरा केला.
जम्मू कश्मीर मधील कलम 370 व कलम 35 हटवल्यामुळे या ठिकानी भारतीय संविधान लागू होवून जम्मू कश्मीर हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश झाला आहे. यामुळे छञपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे व पारगाव येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सचिन (नाना) इंगोले, शहराध्यक्ष बबन (बाबा) कवङे, भाजपा तालुका सरचिटणीस भागवत कवङे, तालुकापाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, सुंदरराव उघङे,पांङुरंग उंद्रे, आण्णासाहेब कवङे,प्रभाकर सारूक, मयुर कवङे, विलास देशमुख,गणेश कवङे, रशिद तांबोळी, क्षीरसागर ब्रदर व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या