हातलाई ऑटो शोरूममध्ये रॉयल इनफिल्ड 350x दाखल:

रिपोर्टर: उस्मानाबाद येथिल हातलाई ऑटो शोरूममध्ये रॉयल इनफिल्ड ३५०xदाखल झाली आहे या मॉडेलचे अनावरण दि ११/८/२०१९ रोजी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील ,प्रो.प्रा. आदित्य सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रॉयल इनफिल्डचे एरिया सेल्स प्रमुख कैवल्य ,केरिया सर्व्हिस प्रमुख विशाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबाद शोरूममध्ये नवीन बुलेट या विविध आकर्षक डिझाइन थीम्समध्ये उपलब्ध आहेत बुलेट ३५०तिचा विद्यमान काळ्या रंगातील  व्हेरिएंटसह  आता बुलेट सिल्वर बुलेट सफायर ब्ल्यू आणि बुलेट फोनिक्स ब्लॅक या तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे बुलेट ३५० इलेक्ट्रॉनिक्स स्टार्टर सध्याच्या मुरूम व सिल्वर या रंगाव्यतिरिक्त जेट ब्लॅक रिंग रोड आणि रॉयल ब्लू या रंगांमध्ये असणार आहे या आकर्षकपणे डिझाइन्स करण्यात आलेल्या मोटार सायकल्समध्ये सिंगल चॅनल एल.ब.एस. असेल तसेच या मोटारसायकलमध्ये ब्लॅक आऊट थीम ब्लॅक व्हिल्स आणि पेट्रोल टाकीवर २डी ग्राफिक रंगसंगती अशी वैशिष्ट्ये असणार आहेत नवीन बुलेट भारतातील रॉयल इनफिल्ड शोरुममध्ये एक्स शोरूम किंमत  १लाख बारा हजार रुपयांमध्ये बुक करता येईल म्हणजेच किक स्टार्ट मध्ये गाडीची ऑनरोड किंमत १लाख ३४ हजार ९९९रुपये व सेल्फ स्टार्ट १ लाख ५० हजार ८२२ रुपये इतकी असून जास्तीत जास्त ग्राहकांनी बुकिंग करावे असे आवाहन हातलाई अॅटो मुख्य व्यवस्थापक सचिन महाडिक यांनी केले आहे.
 या प्रसंगी या कार्यक्रमासाठी अभिराम पाटील, सचिन महाडीक, स्वप्नील पाटील बंडू पाटील,अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या