विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान: शिक्षणमंत्री शिक्षकांच्या आंदोलनाला यश 


रिपोर्टर: विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान मिळणार असून ज्या शाळांना यापूर्वी 20 टक्के अनुदान दिले आहे. त्यांना आता 40 टक्के अनुदान मिळणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
 प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी पुकारलेले आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा निर्णय घेतला.विनाअनुदानित शाळांना 304 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. मोठ्या प्रमाणात या अनुदानाचा लाभ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल, असे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सांगीतले.
कायम विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना अनुदान सुरू करण्यासाठी गेली आठवडाभर शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी आंदोलन तीव्र केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या