रिपोर्टर: एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत 150 महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील.एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार. सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरू आहे.यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.महिलांचा सहभाग वाढावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत.
या महिला चालकांना प्रथम छोटय़ा अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांबपल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.
महामंडळामार्फत आदिवासी युवतींसाठी ‘वाहनचालक प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत 21 आदिवासी युवतींना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या