काश्मीरमध्ये जमावबंदी;कलम 144 लागू: देशभरात संभ्रमाचे वातावरण!

रिपोर्टर: जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी घेतला वेग, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आले आसून तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. इंटरनेट आणि लँडलाईन सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.


जम्मू काश्मीरमध्ये घडत आसलेल्या राजकीय बदलामुळे मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.त्याच बरोबर सर्व सरकारी शाळा, महाविद्यालयं आणि इतर संस्थांना आज सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे.
 कोणत्याही प्रकारची सभा, रॅली किंवा जिथे जमाव एकत्र येईल अशा सगळ्या कृतींवर बंदी घालण्यात आली आहे.
इरफान पठाणसह 100 क्रिकेटपटूंना तत्काळ राज्य सोडण्याचे आदेश देण्यात आले आसून काश्मीरमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कलम 35 अ बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल अशीही शक्यता आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या