राज्यातील 11 पोलिस ठरले केंद्रीय गृहमंत्री पदकाचे मानकरी:





 रिपोर्टर:उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणार केंद्रीय गृहमंत्री
 पुरस्काराचे राज्यातील 11 पोलीस मानकरी ठरले आहेत.उत्कृष्ट
 कामगिरीसाठी दिला जाणा—या केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील 96
 तपास अधिकाऱ्यांचा गौरव झाला असून त्यात महाराष्ट्रातील 11
 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या वर्षीपासून केंद्रीय गृहमंत्री या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सीबीआय - 15 अधिकारी,महाराष्ट्र पोलीस - 11 अधिकारी,उत्तर प्रदेश - 10 अधिकारी,केरळ पोलीस - 9 अधिकारी, मध्य प्रदेश - 8 अधिकारी, दिल्ली व कर्नाटक पोलीस - 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 13, महिला पोलीस
 अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे.

महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी 

1) अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक) 2) श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक) 3) सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक) 4) प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक) 5) प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक) 6) हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक) 7) प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक) 8) सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक) 9) संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक) 10) सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक) 11) सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या