कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या जाचक आटीमुळे प्रकल्प रखडला:आमदार राणाजगजितसिंह पाटील.
रिपोर्टर: कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपादा विभागाकडुन  घालण्यात आलेल्या जाचक आटीमुळे या कामास विलंब होत आसून या बाबत मुख्यमंञ्यांनी बैठक बोलवावी आणि या प्रकल्पाच्या माध्यमातुन बिड,उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करावा आशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे.
उस्मनाबाद येथे आयोजीत पत्रकारपरिषदेमध्ये ही माहीती देण्यात आली.
2016 मध्ये झालेल्या बैठकीमध्ये वर्षाला 1200 कोटी रूपये देवून 4 वर्षात हा प्रकल्प पुर्ण करू आसे आश्वासन मुख्यमंञ्यांनी दिले होते.हा प्रकल्प पुर्ण करण्यासठी 5 हजार कोटीचा निधी आवशक आहे.त्यानुसार वर्षाला कमीत कमी 1200 कोटी रूपये आपेक्षीत आहेत.मात्र आदयाप या कामासाठी 500 कोटी रूपये फक्त देण्यात आले आहेत.या उलट 2018 ला झालेल्या बैठकीमध्ये चालु आसलेल्या कामामध्ये वेगळे निकष लावल्याने हे काम आनखीन धिम्या गतीने चालु आसल्यामुळे 4 वर्षात पुर्ण होणारा प्रकल्प नेमका कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी दर वर्षाला 1200 कोटी रूपये देवून लावण्यात आलेले निकष बदल करावेत आणि काम वेगाने चालु रहावे यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंञ्यांकडे बैठकीची मागणी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या