रिपोर्टर: बोरगाव मंजू

मृग नक्षत्राच्या प्रारंभी वरुन राजाने अल्पशा सरीने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी या वर्षी पाउस बर्यापैकी होईल. या आशेने आपल्या शेतात होते नव्हते विकून बॅक व इतर कर्ज काढून मशागत करून बि बियाणे खरेदी करून मोठ्या आशेवर सोयाबीन, तुर , ज्वारी. कापूस उडीद, मुग आदी पेरणी केली. परंतु गत पेरणी पासून दिड महिना झाला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे मुग, व उडीद पिके धोक्यात आली आहे. शिवाय अपुऱ्या पावसामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली असून आज शेतातील पिके कुपोषित आहे. शिवाय उकाडा मुळे बरड भागातील पिके जळुन नामशेष झाली. गत दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. व पावसाने हजेरी लावली. परंतु अल्प व अवेळी पाऊस पडत असताना दोन इंच भुजल पातळी गाठली नाही. त्यामुळे शेतकरी राजा कमालीचा संकटात सापडला आहे. भविष्यात वाढती महागाई, मुळे विवंचनेत आहे. शिवाय आजही जंगलात चारा उपलब्ध नसल्याने आपल्या पशुधनाचा ना चारा ना पाणी या मुळे शेतकरी कमालीचा धास्तावले आहेत. आता पिकांच्या उत्पादनात घट झाली शिवाय हाती भोपळा लागेल यात मात्र शंका नाही असे शेतकरी वर्गात बोलल्या जात आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाने दिलासा मिळाल्या शिवाय पर्याय नाही एवढे मात्र नक्की.
0 टिप्पण्या