मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा कंधार


रिपोर्टर:        कंधार तालुक्यातील बारुळ येथील बबलू शेख बारुळकर यांच्या आयोजनातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला,
 सकाळी 9 वाजता बारुळ येथील जागृत देवस्थान महादेव मंदिर येथे मा. खा.भास्करराव पाटील खतगावकर यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी महापूजा करण्यात आली,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले,तसेच खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कंधार-लोहा मतदार संघात 2500 झाडे लावण्याचा शेख यांनी संकल्प करत वृक्षारोपण  बारुळ येथून सुरुवात करण्यात आली,आणि बारुळ येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले अश्या अनेक उपक्रमांनी बारुळ येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला आयोजक बबलू शेख बारुळकर सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मुनेश्वर, डॉ.सूर्यवंशी, रावसाहेब नाईक(से.स.सो.चेअरमन बारुळ),हैदर पठाण,सुलतान शेख,हुलाजी वखरडे,सामाजिक वनीकरणचे नारायण टोकलवड,शबीर शेख,शाहरूख पठाण,ए. एल.नरवाडे,डी. के.बोधगिरे, ए. एम.शिखरे,बी बी पांडागळे,अलवादीन शेख,सलीम शेख सह आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या