उत्तरप्रदेश सरकारच्या दंडेलशाहीचा शहर काँग्रेसकडून निषेध प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारविरोधी घोषणाउस्मानाबाद, दि. 20- उत्तरप्रदेश राज्यातील सोनभद्र येथे आदिवासी समाजातील 11 लोकांची हत्या झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील मयत लोकांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सरकारने बेकायदेशीरपणे अटक केले होते. उत्तरप्रदेश सरकारच्या या दंडेलशाही वर्तणुकीचा शनिवारी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला.
भाजपच्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारच्या या दंडेलशाही वर्तणुकीच्या निषेधार्थ शनिवारी उस्मानाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण सरडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, माजी नगरसेवक अ‍ॅड. दर्शन कोळगे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव अ‍ॅड. जावेद काझी, ओबीसी विभागाचे प्रदेश सदस्य धनंजय राऊत, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, विधानसभा उपाध्यक्ष प्रसन्न कथले, राम कदम, शहराध्यक्ष इलियास खान, माजी नगरसेवक अलिम शेख, मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित देडे, सलमान शेख, सुभाष हिंगमिरे, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते. या आंदोलनात प्रचंड घोषणाबाजीने शिवाजी चौक परिसर दणाणून गेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या