पंढरपुक्षेत्री विठ्ठल—रुक्मीणीच्या शासकिय पुजेचा मान मिळालेल्या दाम्पत्याचा शिवसेनेच्या वतिने सत्कार


अहमदपुर. दि. सांगवी सुनेगाव तांडा येथील सौ.प्रयाग विठ्ठल चव्हाण, विठ्ठल मारोती चव्हाण यांना मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या सोबत पंढरपुरक्षेत्री विठ्ठल—रुक्मीणीची शासकीय पुजा करण्याचा मान मिळाला त्यांच्याशी भ्रमनध्वणीवरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. त्यांना एक वर्षाचा मोफत पास एस टी महामंडळाच्या वतिने देण्यात येवून त्यांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते सांगवी तांडा येथे करण्यात आला.
विठ्ठल— रुक्मीणीच्या महापुजेचा मान मिळवणार्‍या दाम्पत्याचे आर्शीवाद घेण्यासाठी संपूर्ण गावातील नागरीक येथील हनुमान मंदिरावर हजर होते, भक्तीभावाच्या सागरात बुडालेल्या गावातील लहान थोर मंडळीनी आर्शीवाद घेत आनंद व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, एस टि कामगार सेनेचे अध्यक्ष राजू कांबळे, सुभाष गुंडीले, बालाजी काळे, सरपंच अर्जुन राठोड, चालक राजपंगे, वाहक गरुडे, गजानन राठोड, सुनिल चव्हाण, संतोष चव्हाण, बंडू चव्हाण, प्रेमदास चव्हाण  यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या