उस्मानाबाद येथे श्री गजानन महाराज स्वागत समीती च्या वतीने वारक—यांना उदया 700 रेनकोटचे होणार वाटप:
रिपोर्टर: श्री गजानन महाराज पालखी स्वागत समीतीच्या वतीने वारकरी भक्तांना विविध प्रकारच्या सुविधासह 700 रेनकोटचे वाटप होणार आहे.उदया उस्मानाबाद येथे श्री गजानन महाराज पालखी स्वागत समिती व उस्मानाबाद मधील सर्व गजानन भक्तगण यांच्या संयुक्त विदयामाने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आसल्याची माहीती स्वगत समीतीचे अध्यक्ष जितेद्र घोडके यांनी दिली आहे. 

आगदी नित्यनियमाने 52 वर्षाची पंरपरा भक्तीभावाने सांभाळत शेगाव ते पढंरपूर आसा पायी प्रवास करण्या—या या पालखीचे उस्मानाबादकर  श्रध्देने दर वर्षी स्वगत करतात. पालखी स्वागत समिती उस्मानाबाद यांच्या वतीने गेली 13 वर्षापासुन पालखी ची सेवा करण्याची परंपरा आहे.दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही वारेक—यांच्या सेवेसाठी आर्वेदीक पचंकर्म मसाज,दाढी,कटीन करण्याची सोय,तसेच चालत आलेल्या वारक—यांचे चप्पल,बुट दुरूस्त करण्याची सोय यासह या वर्षीचा नविन उपक्रम म्हणून 700 रेनकोटचे वाटप वारक—यांना श्री गजानन महाराज पालखी स्वागत समिती व उस्मानाबाद मधील गजानन भक्तगण यांच्या यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या