राज्यातील 24 जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे सावट

 रिपोर्टर: जुलैअखेर पावसाअभावी राज्यातील 24 जिल्ह्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आसून राज्यातील 355 तालुक्यांपैकी 41 तालुक्यात फक्त 40 टक्केच तर 154 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढावले आहे.
हावामानाच्या अंदाजावर आधारीत शेतक—यांनी हालचाल केली हाती परंतू यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरला आहे. राज्यात 140.69 लाख हेक्टर खरीप पिक क्षेत्र असून 22 जुलै अखेर 109.82 लाख हेक्टरवर पेरणी झाली.
आता उशिरा पाऊस पडला तरी कपाशी, सोयाबीन या पिकांऐवजी शेतकऱ्यांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
दुष्काळामुळे कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा आदेश काढून सरकारने तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या