मराठा क्रांती सेना लढवणार विधानसभेच्या 100 जागा रिपोर्टर: आज पुणे येथे पार पडलेल्या मराठा समाज समन्वयकांच्या मॅरेथॉन बैठकीत येत्या विधानसभा निवडणूकीत 100 जागा लढवणार असल्याचे संकेत मराठा क्रांती सेनेने दिले आहेत.
क्रांतिसेनेने शिवसेना भाजप युतीकडे 10 जागांची मागणी केली असून त्या न मिळाल्यास 100 जागांवर निवडणूक लढविण्ययाचे संकेत दिले आहेत.
या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर न जाता मराठा आंदोलनातून तयार झालेले मराठा समाजाचे नेतृत्व विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या