रिपोर्टर : महाराष्ट्र धनुर्विध्या संघटनेच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे घेण्यात आलेल्या सी ४ धनुर्विध्या प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिरात शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण घेत उस्मानाबाद चा कैलास लाला लांडगे राज्यात अव्वल राहिला तर धनुर्विध्या स्पर्धेत कंपाउंड धनुष्य प्रकारात उस्मानाबादचाच प्रज्योत प्रशांत कावरे सुवर्ण पदक पटकावीत सर्वोत्कृष्ट धनुर्धर ठरला आहे.
कैलास व प्रज्योतला उस्मानाबाद जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे मुख्य प्रशिक्षक तथा सचिव प्रविण गडदे , मुख्य प्रशिक्षक तथा सहसचिव अभय वाघोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सर्वप्रथम येणार कैलास लांडगे व सुवर्ण पदकासह इयत्ता दहावीत ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारा प्रज्योत कावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कैलास पाटील, पत्रकार प्रशांत कावरे, जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे सचिव प्रविण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, संतोष खोचरे आदींची प्रमुख उपस्तीथी होती.
0 टिप्पण्या